
संकेश्वर (महंमद मोमीन) : देशाच्या विकासात महिलांचे योगदान मोठे राहिले आहे. महिलांनी स्वतः आरोग्यसंपन्न होण्याबरोबर मुलांना संस्कारसंपन्न बनविण्याचे कार्य करायला हवे असल्याचे सिध्दीदात्री महिला संघाच्या अध्यक्षा श्रीमती एम. के. पाटील यांनी सांगितले. सिध्दीदात्री महिला संघाच्या उदघाटन समारंभात प्रास्ताविक भाषणात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. स्वामी विवेकानंद शाळेच्या सभागृहात उदघाटन सोहळा संपन्न झाला. समारंभाचे अध्यक्षस्थान सौ. शर्मिला आर. पाटील यांनी भूषविले होते.
श्रीमती एम. के. पाटील पुढे म्हणाल्या, महिलांनी मोबाईल, दूरदर्शन पाहण्यात आपला अनमोल वेळ न घालविता वेळेचा सदुपयोग शरण साहित्याचे वाचन आणि मुलांना संस्कारसंपन्न घडविणेसाठी करायला हवे असल्याचे सांगून नव्याने प्रारंभ करण्यात आलेल्या सिध्दीदात्री महिला संघाचे ध्येयधोरण सदस्यांना समजावून सांगितले.
प्रमुख पाहुण्या राणी चन्नम्मा विश्वविद्यालयाच्या प्रा.मैत्रियनी गदीगेपगौडर म्हणाल्या, महिलांंच्या त्याग आणि श्रमातून घरसंसार चालते. परिस्थितीशी सामना करण्यासाठी महिलांनी सक्षम बनण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. पाहुण्या गीता भाते म्हणाल्या नव्याने प्रारंभ होत असलेल्या सिध्दीदात्री महिला संघांने महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध व्हावे असे सांगितले. समारंभाला सिध्दीदात्री महिला संघाच्या उपाध्यक्षा ज्योती शिरकोळी, सचिव सविता नष्टी, संचालिका राजेश्री मुडशी, महानंदा पाटील, अश्विनी नेरली, पूजा कुरबेट, चिन्मया हंजी, अनुसया बेळवी, लक्ष्मी बस्तवाडी, सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशिका शिवापूरे यांनी केले. आभार सरोजा सनकल्ल यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta