
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर नामदेव शिंपी दैवकी समाजातर्फे आझादी का अमृतमहोत्सव सोहळा उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर जवळ भूसेनेतील जवान गुरुनाथ गुडशी यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नंदा बोंगाळे, रुपा काकडे यांनी आझादी का अमृतमहोत्सव सोहळा या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. गांधी चौकात नामदेव महिला मंडळाने देशभक्तीपर गितांच्या धूनवर शानदार नृत्याविष्कार सादर केला. नृत्याचे दिग्दर्शन कुमारी वैष्णवी मुळे यांनी केले. नृत्यातून भारतातील विविध प्रांतांची संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. गावातील प्रमुख मार्गे प्रभातफेरी काढून लोकांत देशाभिमान जागविण्याचे कार्य नामदेव तरुण मंडळ, नामदेव महिला मंडळाने केले. प्रभातफेरीत मुरलीधर उंडाळे, श्रीनिवास कोळेकर, नारायण उंडाळे, गणेश कोळेकर, चरण खटावकर, प्रसाद भागवत, उमेश मिरजकर, आनंद काकडे, कपिल कोळेकर, समाज बांधव, मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta