संकेश्वर (महंमद मोमीन) : चित्रपट, टीव्ही आणि मोबाईलवरील क्राईम स्टोरीचा प्रभाव युवा वर्गात प्रकर्षाने पहावयास मिळत आहे.संकेश्वर भागात घडणाऱ्या अनेक गुन्ह्यांमध्ये युवकांचा सहभाग दिसतो आहे. चित्रपटातील क्राईमच्या घटना युवकांना प्रभावित करतांना दिसत आहेत. संकेश्वरात कोणी खुनाच्या आरोपाखाली तर कोणी हाफ मर्डरच्या गुन्ह्याखाली, कोणी अपहरण प्रकरणात कारागृहाची हवा खातांना दिसत आहे. क्राईम स्टोरीने प्रभावित झालेला प्रसाद ऊर्फ बबलू संजय राऊत (वय २०) राहणार अकोळ तालुका निपाणी सध्या राहणार गोरक्षणमाळ संकेश्वर यांनी २ ऑगस्ट २०२२ रोजी कु. साई भास्कर काकडे (वय १४) या मुलांचे अपहरण नाट्य घडवून आणल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी दिली. बबलूने आपल्या पाच साथीदारांना सोबत घेऊन कु. साईचे अपहरण केले होते. पण संकेश्वर पोलिसांनी त्यांचा डाव मोडीत काढला आहे. भास्कर काकडे यांच्याकडून पाच लाख रुपयांची खंडणी करिता रचला गेलेला बबलूचा प्लॅन फसला आहे. अपहरण प्रकरणात बबलू बरोबर दिपक शामसिंग बिलावर (वय २१) राहणार नदी गल्ली संकेश्वर, सुल्तान ऊर्फ राजू हुसेन मुजावर (वय १९) राहणार वंटमूरी काॅलनी बेळगांव, रमेश यलप्पा बिजगत्ती (वय १९) राहणार वंटमूरी काॅलनी रामतिर्थ नगर बेळगांव, सौरभ दगडू तळवार (वय २२) राहणार डाॅलर काॅलनी निपाणी, विनायक पंढरीनाथ पांडव (वय २३) राहणार खरी काॅर्नर चांभार गल्ली निपाणी सहभागी असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्रपट टीव्ही आणि मोबाईलवरील क्राईम सिन गुन्हेगारीचा पर्दाफाश करण्यासाठी दाखविले जातात. त्यातून चांगलं बोध घेण्याची आवश्यकता असतांनाच युवक क्राईमकडे वळताना दिसताहेत ही दुर्देवाची गोष्ट म्हणावी लागेल.
Belgaum Varta Belgaum Varta