संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर संतसेना नाभिक समाजाची सभा शिवाजी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदी विजय महादेव माने, उपाध्यक्षपदी कुमार केशव कदम, सेक्रेटरी शशीकांत शिंदे, खजिनदार विजय शिंदे बिनविरोध निवडले गेले आहेत. संचालक मंडळात विनोद गंगाधर, सागर शिंदे, शंकर सुर्यवंशी, विशाल माने, महादेव जाधव, संजय कंबळकर, बंडू कंबळकर, रवि कंबळकर, सल्लागार समितीत रमेश माने, दत्ता शिंदे, नेताजी कंबळकर, शिवाजी कंबळकर, शरद जाधव यांची निवड करण्यात आली आहे. समाजाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचे समाज बांधवांतून अभिनंदन केले जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta