
संकेश्वर (महंमद मोमीन) : आम आदमी पक्षातर्फे बेळगांव जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व १८ जागा लढविल्या जाणार असल्याचे आम आदमी पक्षाचे कर्नाटक उत्तर विभाग प्रमुख राजीव टोपण्णावर यांनी सांगितले. संकेश्वरात आज आम आदमी पक्षाच्या रॅलीतून त्यांनी जनतेला भ्रष्टाचार मुक्त भारतासाठी आम आदमीला आर्शिवाद करा, असे सांगितले. पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले, हुक्केरी विधानसभा मतदारसंघात समझोत्याचे राजकारण चालले आहे. त्यामुळे येथे विकास खुंटला आहे. हुक्केरी विधानसभा मतदारसंघातील जनतेला अच्छे दिन येण्याकरिता आम आदमीला लोकांनी साथ द्यायला हवी आहे. हुक्केरी मतक्षेत्रातून “आप” लढवय्या युवा उमेदवाराला निवडणूक रिंगणात उतरविणार आहे. राज्यातील, हुक्केरीतील भ्रष्टाचार आणि गुंड प्रवृत्तीला गाडण्यासाठी एकच पर्याय म्हणजे “झाडू”आहे. आम आदमी पार्टी जनतेला झिरो पाण्याचे बिल, झिरो विद्युत बिल, मोफत आरोग्य सेवा, बससेवा, घरपोच सरकारी सेवा मिळवून देण्याचे कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राजीव टोपण्णावर यांनी छोट्या व्यापारींना, आम जनतेला आम आदमी पक्षाची ध्येयधोरणे समजावून सांगितली. यावेळी त्यांनी संगोळी रायण्णा, छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेला, श्री बसवेश्वर पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.
यावेळी बशीरअहमद जमादार, जुनेद पाशा, नेहाल, अब्दुल शेख, नुमान खानापूरे, एम के सय्यद, एफ.ए सौदागर, समीर सय्यद, पिंटू सुर्यवंशी, संतोष सत्यनाईक, मंजू मरडी, युवराज पात्रोट, मोहसिन पठाण, विश्वनाथ खंचनाळी, अमन आवटे, गौतम मरडी कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta