
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठात आयोजित कोटीलिंगार्चन समाप्ती सोहळ्यात राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी सहभागी होऊन देवदर्शनाबरोबर श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींचा आशीर्वाद घेतला. मंत्रीमहोदयांना बेळगांव गोल्फ कोर्स मैदानात ठाण मांडून बसलेल्या बिबट्याची चांगलीच डोकेदुखी झालेली दिसत आहे. गेले २४ दिवस झाले वन विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी कर्मचारी शत प्रयत्न करुन देखील बिबट्या कांहीं जेरबंद होईनासा झाला आहे. त्यामुळे आज मंत्रीमहोदयांनी संकेश्वर ग्रामदैवत श्री शंकराचार्य संस्थान मठात महादेवाचे दर्शन घेवून बिबट्याला जेरबंद करण्याची प्रार्थना केली आहे. देवदर्शन आणि श्रींचा आशीर्वाद घेऊन बोलताना मंत्री उमेश कत्ती म्हणाले, बिबट्या लवकरच जेरबंद होईल. प्राणी जेरबंद करणारे तज्ञ, वन विभागाचे अधिकारी, पोलिस अधिकारी कर्मचारी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताहेत. लवकरच बिबट्या जेरबंद होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, नगरसेवक गंगाराम भूसगोळ, सचिन भोपळे, संदिप दवडते, जयप्रकाश सावंत, संदिप गंजी गिरीश कुलकर्णी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta