संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठात श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात श्रावणात महिनाभर चाललेल्या कोटीलिंगार्चन अनुष्ठानची भक्तीमय वातावरणात सांगता करण्यात आली. कोटीलिंगार्चन पूजन अर्चन विसर्जन मिरवणुकीत श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजी, पुरोहित श्रीपाद उपाध्ये, वामन पुराणिक, संतोष जोशी, मदन पुराणिक, अवधूत जोशी, भाग्येश जोशी, गिरीश कुलकर्णी, सुहास कुलकर्णी, दिपक कुलकर्णी भक्तगण सहभागी झाले होते. कोटीलिंगार्चन विसर्जन सोहळ्यानंतर महाप्रसादाचा लाभ हजारो भक्तगणांनी घेतला. कोटीलिंगार्चन अनुष्ठान सांगता सोहळ्यात राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, बसनगौडा पाटील, शंकरराव हेगडे, दिपक भिसे, बसवराज बागलकोटी, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अमर नलवडे, संजय शिरकोळी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक डॉ. मंदार हावळ, सचिन भोपळे, नंदू मुडशी, रोहण नेसरी, गंगाराम भूसगोळ, राजू शिंदे, संदिप दवडते, जयप्रकाश सावंत, नागेश क्वळी, संदिप गंजी, हिरण्यकेशी साखर कारखान्याचे व्यवस्थापक संचालक सातप्पा कर्किनाईक, जयसिंग सनदी, भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.