Thursday , September 19 2024
Breaking News

निडसोसी मठाचा सोमवारी महादासोह

Spread the love

संकेश्वर (महंमद मोमीन) : निडसोसी श्री जगद्गुरू दुरदुंडीश्वर सिध्द संस्थान मठाचा महादासोह सोहळा येत्या सोमवार दि. ५ सप्टेंबर २०२२ रोजी होत आहे. निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात दासोह निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि ४ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता नणदीचे श्रीमंत विजयसिंह नानासाहेब निंबाळकर सरदेसाई यांचे हस्ते चांदणी पूजनाने दासोह कार्यक्रमाची सुरुवात केली जाणार आहे. सकाळी ११ वाजता भाकरी दासोह होईल. सायंकाळी ७ वाजता पुराण मंगल कार्यक्रमात संगणक युगामध्ये मठांची आवश्यकता विषयावर व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाला सानिध्य कोडीमठाचे परमपूज्य डॉ. शिवानंद राजयोगेंद्र महास्वामीजी, शिवमोगाचे डॉ. मल्लीकार्जुन महास्वामीजींचे लाभणार आहे. कार्यक्रमाला मठाधिशांचे नेतृत्व लाभणार असून प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रकाश हुक्केरी, आमदार गणेश हुक्केरी, माजी मंत्री ए. बी. पाटील, वीरकुमार पाटील, शिरगुप्पी शुगर्सचे अध्यक्ष कलप्पा मगेण्णावर, श्रीमंत सरकार रविंद्र मुरारीराव, मुतालिक देसाई, गरग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सिध्दबसनगौडा पाटील, पोलिस उपनिरीक्षक मल्लीकार्जुन सत्तीगौडर पूज्य प्रशांत देवरु उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात पूज्य श्री शिवशरण देवरु यांचे संपूर्ण श्रावण महिन्यात चाललेल्या जीवन दर्शन आणि वचन विस्तार प्रवचनाची सांगता केली जाणार आहे. सोमवार दि. ५ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजता श्री दुरदुंडीश्वर महाशिवयोगींचा पालखी महोत्सव होत आहे. दुपारी १२ वाजता श्रींच्या हस्ते प्रसाद पूजनाने महादासोहच्या महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. मंगळवार दि. ६ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता ज्ञानदासोह कार्यक्रम होत असून कार्यक्रमाला संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजी, नडोणीचे परमपूज्य श्री सिध्दलिंग महास्वामीजी आणि अन्य श्रींचे सानिध्य लाभणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं, धर्मादाय मंत्री शशीकला ज्वोल्ले, खासदार अण्णासाहेब ज्वोल्ले,माजी खासदार रमेश कत्ती, माजी आमदार महांतेश कवठगीमठ, श्रीमंत सरकार राजेश्वरी मुतालिक देसाई, श्रीमंत सरकार गौरवसिंह मुतालिक देसाई, संकेश्वर पोलिस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी, उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात योध्दांचा सत्कार केला जाणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

Spread the love  दड्डी : सलामवाडी ता. हुक्केरी येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित घटप्रभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *