Thursday , September 19 2024
Breaking News

वल्लभगडात सेवानिवृत्त सुभेदार पांडुरंग बोरे यांचे जंगी स्वागत…

Spread the love

 

संकेश्वर (महंमद मोमीन) : वल्लभगड गावाचे सुपुत्र सुभेदार पांडुरंग बंडू बोरे हे मराठा लाईट इन्फन्ट्रीमध्ये २८ वर्षांची उत्तम सेवा बजावून सेवानिवृत्त झाले. ते गावाकडे परतले असता वल्लभगड येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. वल्लभगडात आदर्श युवक ढोल ताशा पथकाच्या निनादात सेवानिवृत्त सुभेदार पांडुरंग बोरे यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गात गडवासियांनी आपल्या सुपुत्राचे‌ सहर्ष स्वागत केले. मिरवणुकीत वल्लभगड व हरगापूर गावातील मान्यवर नागरिक, आजी माजी सैनिक गावकरी सहभागी झाले होते. मिरवणुकीची सांगता झालेनंतर सेवानिवृत्त सुभेदार पांडुरंग बोरे यांचा यथोचित सन्मान हरगापूर ग्रामपंचायतचे अध्यक्ष रविंद्र शेलार यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान रविंद्र शेलार यांनी भूषविले होते. प्रमुख पाहुणे म्हणून आनंद शेंडे, शिवाजी शेलार, सुभेदार मेजर भिमाप्पा नवनी, प्रकाश मगदूम, विलास शेलार, आनंदा भोसले, सदाशिव शेलार, शिवराम शेलार, बच्चाराम खाडे, लक्ष्मण शेंडे, आण्णासाहेब कांबळे, विष्णू मंत्रेशी, सुधाकर माने ग्रामपंचायत सदस्य संजय कोकीतकर, विनोद कांबळे उपस्थित होते.यावेळी बोलताना प्रकाश मगदूम म्हणाले आज युवकांमध्ये राष्ट्रभक्ती रुजली पाहिजे. देशाच्या सिमेवर जवान देशाचे रक्षण नि:स्वार्थ आणि त्यागमय वृत्तीतून करत असतात म्हणून आम्ही सुरक्षित आहोत.याकरिता जवना प्रती सर्वांनी आदरभाव ठेवायला हवा आहे.वल्लभगड वासियांनी पांडूरंग बोरे यांची गावातून भव्य मिरवणूक काढून जवानाप्रती आदरभाव दाखवून दिला आहे. यावेळी सेवानिवृत्त सुभेदार पांडुरंग बोरे यांचा सत्कार वल्लभगड वेबसाईट समितीतर्फे गजानन साळुंखे ,राजेंद्र जेधे, ग्रामपंचायत सदस्य विनोद कांबळे, संजय कोकितकर यांनी केला.याप्रसंगी राजू खानोरे, आप्पासाहेब पाटील, आकाश शेलार, रावसाहेब पाटील, मारुती नेर्ली, सुब्राव मोहिते,रमेश शेलार, निवृत्ती शेलार,काडाप्पा हलट्टी, जोतिबा जोधंळे, गुंडू गायकवाड, विशाल खाडे आजी माजी सैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पुंडलिक कुंडेकर यांनी केले.आभार गजानन साळुंखे यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

Spread the love  दड्डी : सलामवाडी ता. हुक्केरी येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित घटप्रभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *