Tuesday , March 3 2026
Breaking News

संकेश्वरात पंचमसालीचा जयजयकार…

Spread the love

 


संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री बसवेश्वर सर्कल, चन्नम्मा सर्कल ते गावातील प्रमुख मार्गे आज पंचमसालीची भव्य बाईक रॅली काढण्यात आली. रॅलीला दिव्य सानिध्य कुडलसंगम लिंगायत पंचमसाली प्रथम जगद्गुरू श्री बसवजय मृत्युंजय महास्वामीजींचे लाभले होते. रॅलीत श्री बसवेश्वर महाराज की जय, पंचमसाली की जय, अशा जयघोषणा दिल्या जात होत्या. रॅलीची सांगता श्री दुरदुंडीश्वर सभा भवन येथे करण्यात आली. येथे प्रतिज्ञा पंचायत अभियान जागृत सभा घेण्यात आली सभेला उद्देशून बोलताना कुडलसंगम लिंगायत पंचमसाली प्रथम जगद्गुरू श्री बसवजय मृत्युंजय महास्वामीजी म्हणाले पंचमसाली समाजातील जादात्तर लोक शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची राहिली आहे. याकरिता पंचमसाली समाज आरक्षणासाठी लढा देत आहे. समाजातील भावी पिढीला आरक्षणाचा लाभ मिळवून देण्यासाठी पंचमसालीचा लढा सुरू आहे. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी पंचमसाली समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या आश्वासनावर झुलवत ठेवण्याचे कार्य केले. विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी आरक्षण मिळवून देण्याचा शब्द दिला आहे. तो त्यांनी पाळला नाही तर मुख्यमंत्री कार्यालयाजवळ धरणी सत्याग्रह छेडण्याचा इशारा श्रींनी दिला आहे.यावेळी संकेश्वर वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष अप्पासाहेब शिरकोळी, माजी मंत्री शशीकांत नाईक, डॉ. राजेश नेरली, डॉ. टी. एस. नेसरी, शिवानंद संसुध्दी, बसनगौडा पाटील, पवन कत्ती, पृथ्वी कत्ती, विजय रवदी, वृषभ पाटील, संतोष मुडशी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक नंदू मुडशी, चिदानंद कर्देण्णावर, कुमार बस्तवाडी, प्रदीप माणगांवी, विजय जरळी, संतोष कमनुरी, चेतन बशेट्टी, उमेश फडी, किरण नेसरी, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

हिरण्यकेशी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शहरातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *