
हुक्केरी : हुक्केरीचे लोकप्रिय आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांच्या निधनामुळे हुक्केरी-संकेश्वरातील व्यापारी वर्गाने आज बंद पाळून आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली वाहिली. हुक्केरी-संकेश्वरातील बंदमुळे सर्वत्र शुकशुकाट पसरलेला दिसला. शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्यामुळे बाहेर गावाहून आलेले विद्यार्थी घराकडे परतताना दिसले. होती. बंदमुळे गावातील प्रमुख बाजारपेठ आणि सर्वच रस्ते निर्मनुष्य दिसले.
निलगारचे दर्शन बंद…
हुक्केरीचे लोकप्रिय आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांच्या निधनामुळे आज संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपतीचे दर्शन बंद ठेवण्यात आल्याचे निलगार गणपतीचे प्रमुख शिवपुत्र हेद्दुरशेट्टी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. निलगार गणपतीचे दर्शन बंद ठेवण्यात आल्याने बाहेर गावाहून गणपती दर्शनासाठी आलेल्या भक्तगणांना आज दर्शनाचा लाभ घेता आला नाही. गुरुवार दि. ८ सप्टेंबर २०२२ पासून भक्तगणांना निलगार गणपतीचे दर्शन सुरू केले जाणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta