Thursday , September 19 2024
Breaking News

संकेश्वर पालिकेत रस्ता नामकरण विषयावर जोरदार चर्चा…

Spread the love

 


व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये उमेश सहभागी
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिकेच्या मासिक सभेत हिरण्यकेशी साखर कारखाना ते सोलापूर फाटा दरम्यानच्या जुन्या पी.बी. रोडला दिवंगत उमेश कत्ती मार्ग आणि पन्नास एकर जमीनीत साकारत असलेल्या निवासी योजनेला उमेश कत्ती नगर असे नामकरण करण्याच्या विषयावर सत्तारुढ आणि विरोधी नगरसेवकांत एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे रस्ता नामकरणाचा विषय स्थगित ठेवणेत आला आहे.सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनिल पर्वतराव यांनी भूषविले होते. सत्तारुढ नगरसेवक अमर नलवडे, संजय शिरकोळी, नंदू मुडशी, ॲड. प्रमोद होसमनी, गंगाराम भूसगोळ, रोहण नेसरीसह सत्तारुढ नगरसेवकांनी उमेश कत्ती रस्ता नामकरणाला सहमती दर्शवली तर विरोधी गटाचे नगरसेवक जितेंद्र मरडी, चिदानंद कर्देण्णावर, डॉ. जयप्रकाश करजगी, विनोद नाईकसह काॅंग्रेस सदस्यांनी सदर रस्त्याला सहकार महर्षी अप्पणगौडा पाटील, नगरला माजी मंत्री दिवंगत मल्हारगौडा पाटील नामकरण करण्याच्या मागणीवर ठाम राहिल्याने नामकरण विषय अखेर स्थगित ठेवण्यात आला आहे. सभेत नगरसेविका रिजवाना रामपूरे, संगिता कोळी यांनी आपल्या प्रभागातील समस्या मांडल्या.

प्रभाग १४ मधील समस्यांकडे दुर्लक्ष का ?
प्रभाग क्रमांक १४ चे नगरसेवक उमेश कांबळे व्हिडिओ काॅन्फरन्सने सभेत सहभागी झालेले दिसले.. त्यांना पाहण्यासाठी सदस्यांत औत्सुक्य निर्माण झालेले दिसले. उमेश कांबळे हे गंभीर आरोपाखाली तुरुंगात अटक असल्याने गेल्या दोन सभांना ते गैरहजर राहिल्यांने त्यांचे सदस्यत्व आजच्या सभेत रद्द होण्याची शक्यता असल्याने त्यांनी न्यायालय आणि तुरुंगाची विशेष परवानगी मिळवून आजच्या सभेत आपला सहभाग दर्शविला. उमेश कांबळे यांनी व्हिडिओ काॅन्फरन्सच्या माध्यमातून मुख्याधिकारी आर सी चौगुला अभियंता आर. बी. गडाद यांना थेट सवाल केला. ते म्हणाले मी, प्रभागात नसल्याने तुम्ही प्रभाग क्रमांक १४ मधील विकासकामांकडे दुर्लक्ष केलात. त्यामुळे प्रभागातील विकास कामे रखडली आहेत. माझ्या प्रभागात रखडत पडलेल्या विकासकामांना प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. सर्वच सदस्यांशी त्यांनी हसतमुखाने संवाद साधला. सभेला नगरसेविका श्रीविद्या बांबरे, महादेवी संसुध्दी, सुचिता परीट, शेवंता कब्बूरी, संगिता कोळी, पार्वती नाईक, लता मरडी, रिजवाना रामपूरे, सविता नष्टी, नगरसेवक विवेक क्वळी, सचिन भोपळे, डॉ. मंदार हावळ, हारुण मुल्ला, उपस्थित होते. सभेत अन्य विषयांवर देखील चर्चा करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

Spread the love  दड्डी : सलामवाडी ता. हुक्केरी येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित घटप्रभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *