Saturday , September 21 2024
Breaking News

संगमला सहकार्य हवे : राजेंद्र पाटील

Spread the love

 


संकेश्वर (महंमद मोमीन) : हिडकल डॅम येथील श्री संगम सहकारी साखर कारखाना प्रगतीपथावर नेण्यासाठी सभासदांचे सहकार्य हवे असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितले. ते संगम साखर कारखाना वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानी बोलत होते. प्रारंभी हुक्केरीचे लोकप्रिय आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांच्या प्रतिमेचे पूजन करुन श्रध्दांजली वाहण्यात आली. उपस्थितांचे स्वागत संचालक अमरनाथ महाजनशेट्टी यांनी केले. राजेंद्र पाटील पुढे म्हणाले, संगम कारखान्याची धुरांडी पेटण्यास तब्बल वीस वर्षांचा कालावधी लागला आहे. संगम कारखाना सभासदांच्या बहुमोल सहकार्यातून मोठ्या कष्टातून सुरू करण्यात आले आहे. संगम कारखाना प्रगतीपथावर नेण्यासाठी इथिनाॅल घटकांची स्थापना आणि सहविद्युत प्रकल्प राबविण्याची आवश्यकता आहे. त्याकरिता सभासदांचे सहकार्य आपणाला हवे आहे. बंद संगम कारखान्याला ऊर्जितावस्था मिळवून देण्याचे कार्य सभासदांनी केले आहे. आता इथिनाॅल घटकला हातभार लावण्याची आवश्यकता आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोना माहामारीचा सामना करीत संगम उभे राहिले आहे. संगमकडून सभासदांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्याचे काम संचालक मंडळ निश्चितपणे करुन दाखविणार आहे. गतवर्षी संगमने 2 लाख 40 हजार. 748 मेट्रीक टन ऊस गाळपासाठी आणून 2 लाख 79 हजार 965 क्विंटल साखरेचे उत्पादन करुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रति टन 2700 रुपये दर देण्याचे कार्य करुन दाखविलेली आहे. यावर्षी 4 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवून घेण्यात आले आहे. ऊस तोडणीसाठी बीडचे 438 गॅंग तयार करण्यात आले आहेत. संगमला ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टनास अर्धा किलो प्रमाणे साखर दिले जाणार आहे. जे सभासद संगमला ऊस पुरवठा करीत नाहीत. त्यांना देखील साखर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बंद संगम कारखान्याला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेंने 35 कोटी रुपये, मंगळूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 20 कोटी रुपये, बागलकोट जिल्हा बॅंकेचे 10 कोटी रुपये अर्थसहाय्य केले असल्याचे त्यांनी सांगितले.

संगमसाठी घरदार, शेतीवर बोजा…
गेली वीस वर्षे बंद असलेला संगम साखर कारखाना सुरू करण्यासाठी कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी स्वतः चे घरदार, शेतीवर 1 कोटी 70 लाख रुपयांचा बोजा केला आहे. संगम सुरू करण्यात राजेंद्र पाटील यांचे मोठें योगदान राहिल्याचे संचालक के. बी. पाटील यांनी सांगितले. सभेला कारखाना उपाध्यक्ष शंकरराव भांदुर्गे, संचालक शशीकांत नाईक, अण्णासाहेब पर्वतराव, बसगौडा पाटील, गुरु पाटील, अर्जुन पाटील, सुभाष पाटील, संगिता करगुप्पी, राजेश्री कवठगीमठ, श्रीमंत सननाईक, शिवप्पा गस्ती, अमरनाथ महाजनशेट्टी, व्यवस्थापक संचालक एम.एन मनी, तसेच कुणालगौडा पाटील, बसवराज बागलकोटी, सुनिल पर्वतराव, राजेंद्र बोरगांवी, सचिन हेगडे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

Spread the love  दड्डी : सलामवाडी ता. हुक्केरी येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित घटप्रभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *