Thursday , September 19 2024
Breaking News

संकेश्वर मराठा समाज सोसायटीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Spread the love

 


संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर मराठा समाज सोसायटीच्या वार्षिक सभेत समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. हुक्केरीचे लोकप्रिय आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री दिवंगत उमेश कत्ती यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रध्दांजली वाहण्यात आली. उपस्थितांचे स्वागत व अहवाल वाचन राजू जाधव यांनी केले. प्रास्ताविक एल पी शेंडगे यांनी केले. हुक्केरी तालुक्यातील दहावी व बारावी परीक्षेतील समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी छायाचित्रकार राघवेंद्र देवगोजी, रवी शेलार, अभय शिंदे यांचाही सत्कार करणेत आला. प्रकाश पाटील शिपुर, जयप्रकाश सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सभेला उद्देशून बोलताना संकेश्वर मराठा समाज सोसायटीचे अध्यक्ष अमर नलवडे म्हणाले, आजचे युग हे संगणकाचे असल्याने विध्यार्थ्यांनी संगणकाचे ज्ञान अवगत करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. व्यसपीठावर मराठा समाजाचे अध्यक्ष अमर नलवडे, एल पी शेंडगे, इंदुराव मोरे, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, रमेश कुरणकार, शिवाजीराव कळवीकट्टीकर, मधुकर माने, अविनाश नलवडे, जयप्रकाश सावंत ,राजू जाधव विराजमान झाले होते. कार्यक्रमास प्रभाकर, दिपक भिसे, राजेश गायकवाड, कडगावी सर, विठ्ठल पाटील, महेश दिवेकर आनंद शेंडे, अप्पा शिंत्रे, शशिकला मोरे, सुहास भिसे, आनंद मोरे, युवराज मोरे, पुष्पराज माने समाज बांधव पालक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. आभार विठ्ठल पाटील यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

Spread the love  दड्डी : सलामवाडी ता. हुक्केरी येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित घटप्रभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *