
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री शंकरलिंग क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. सभेचे अध्यक्षस्थान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळकृष्ण हतनुरी यांनी भूषविले होते. सभेच्या प्रारंभी हुक्केरीचे लोकप्रिय आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री दिवंगत उमेश कत्ती यांच्या प्रतिमेचे पूजन करुन श्रध्दांजली वाहण्यात आली. उपस्थितांचे स्वागत संचालक शंकरराव हेगडे यांनी केले. सभेला उद्देशून बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजी कळवीकट्टेकर म्हणाले, श्री शंकरलिंग सौहार्दला चालू आर्थिक वर्षात ५६ लाख ८६ हजार रुपये नफा झाला आहे. संस्थेने सभासदांना २५ टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल ५२ कोटी १८ लाख ६१ हजार रुपये असून संस्था सभासदांच्या विश्वासाला पात्र ठरली आहे. संस्थेची चिकालगुड आणि देसनूर शाखा प्रगतीपथावर वाटचाल करीत असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेचे जनरल सेक्रेटरी रामू कापसे यांनी सहकारातील नवीन नियमावली समजावून सांगितली. अहवाल वाचन सेक्रेटरी श्रीकांत गायकवाड यांनी केले. सभेचे सूत्रसंचालन राजू कुंभार यांनी केले. सभेला संचालक श्रीकांत हतनुरी, संतोष हतनुरी, सौ. मंजुळा डी. हतनुरी, शंकरराव हेगडे, महादेव केसरकर, सिध्दू हतनुरी, बसवाणेप्पा कमतगी, सौ. जयश्री नार्वेकर,भरत शेंडे, प्रकाश घाटगे, सुखदेव नार्वेकर, मारुती हत्तरवाटे, श्रीमती शांता जुम्माई, राजेश गायकवाड, बसवराज बस्तवाडी, अप्पासाहेब बस्तवाडी, बंडू सुर्यवंशी, विष्णू जाधव, प्रभाकर देसाई, महादेव डावरे, सभासद उपस्थित होते.
आभार राजू पाटील यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta