Thursday , September 19 2024
Breaking News

संकेश्वरात २४ तास पाणी कोठे आहे?

Spread the love

 


संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात २४ तास पाणीपुरवठा नसताना मिटर रेडिंगनुसार पाण्याची बिले आकारणी कशासाठी? असा प्रश्न नगरसेवकांनी पालिका सभेत उपस्थित करताच मुख्याधिकारी आर. सी. चौगुला, अभियंता आर. बी. गडाद यांची गोची झालेली दिसली. सर्वच २८ सदस्यांनी संकेश्वरातील अन्यायकारक पाणीपट्टी त्वरीत थांबवून वर्षाकाठी २ हजार रुपये पाणीपट्टी आकारणी करण्याची मागणी केली आहे. माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अमर नलवडे म्हणाले, संकेश्वर पालिकेला जेव्हा २४ पाणीपुरवठा करणे शक्य होईल. तेंव्हांच मिटर रेडिंगनुसार बिल आकारणी करावे. सध्या वर्षाकाठी दोन हजार रुपये प्रमाणे पाणीपट्टी आकारणेत यावी असे सांगितले. सभापती सुनिल पर्वतराव म्हणाले सरसकट सर्व नळधारकांकडून दोन हजार प्रमाणे पाणीपट्टी आकारणी केल्यास पालिकेच्या महसूलात वाढ होणार असल्याचे सांगितले. नगरसेवक जितेंद्र मरडी म्हणाले माझ्या प्रभागात पाणीच येत नाही. त्यामुळे पाणीपट्टी कशासाठी भरायची असा प्रश्न उपस्थित केला. नगरसेवक विनोद नाईक म्हणाले, आपल्या प्रभागात नळपाणी पुरवठा विस्कळित झाला आहे. त्यामुळे लोकांतून ओरड सुरू आहे. नगरसेवक डॉ. जयप्रकाश करजगी म्हणाले, २४ तास पाणीपुरवठ्याच्या नावाखाली अन्यायकारक पाणीपट्टी वसुली केली जात आहे. पालिकेने ताबडतोब मिटर रेडिंगचे कार्य थांबवून वर्षाकाठी दोन हजार रुपये प्रमाणे पाणीपट्टी आकारणेचे कार्य करावे, असे सांगितले. सर्वच नगरसेवक नगरसेविकांनी अन्यायकारक पाणीपट्टीला विरोध दर्शवून वर्षाकाठी दोन हजार रुपये पाणीपट्टी आकारणीला आपली सहमती दर्शवली आहे.

ना नफा ना तोटा…
अभियंता आर. बी. गडाद म्हणाले, २४ तास पाणीपुरवठा योजना ना नफा ना तोटा तत्वाखाली चालविली जात आहे. मिटर रेडिंगनुसार ६० टक्के नळधारकांचे पाण्याचे बिल कमी येत आहे. त्यामुळे मिटररेडिंगनुसार बिल आकारणी केली जात असल्याचे स्पष्टीकरण दिले.

२४ तास पाणीपुरवठा नाहीच..
बेळगांव असो संकेश्वरात २४×७ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असली तरी २४ तास पाणीपुरवठा करणे शक्य झालेले नाही. योजनेच्या नियमानुसार बिल आकारणी मिटर रेडिंगनुसारच करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.

दोन हजार रुपयांचा ठराव...
पालिकेतील सर्वच २८ सदस्यांनी अन्यायकारक पाणीपट्टी विरोध आवाज उठविला आहे. सर्वानुमते संकेश्वरची पाणीपट्टी वर्षाकाठी दोन हजार रुपये प्रमाणेच आकारणी करणेचा ठराव मांडला आहे. त्यामुळे संकेश्वरकरांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

Spread the love  दड्डी : सलामवाडी ता. हुक्केरी येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित घटप्रभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *