Tuesday , March 3 2026
Breaking News

मल्लिकार्जुन सौहार्दला १३ लाख रुपये नफा, सभासदांना 20 टक्के लाभांश जाहीर

Spread the love

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री मल्लिकार्जुन अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेला चालू आर्थिक वर्षात १३ लाख ७४ हजार रुपये नफा झाला असून सभासदांना 20 टक्के लाभांश देत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन डी. पट्टणशेट्टी यांनी सांगितले.

ते मल्लिकार्जुन सौहार्दच्या १७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानी बोलत होते. सभेच्या प्रारंभी हुक्केरीचे लोकप्रिय आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री दिवंगत उमेश कत्ती यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थितांचे स्वागत मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी यांनी केले. अहवाल वाचन श्रीमती कल्पना मन्नीकेरी (सीईओ) यांनी केले. सत्कारमूर्तींचा परिचय निसारअहमद कलावंत यांनी करुन दिला. सत्कारमूर्ती डॉ. एम. सी. होसूर दांपत्य, डॉ. चेतन कंकणवाडी, मोतीलाल जकाते, चार्टर्ड अकाॅंन्टंट आनंद पाटील, निर्मला पाटील, क्रिडापटू कुमार प्रितम निलाज यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी, उपाध्यक्ष डॉ. विनोद गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. संस्थेतर्फे सौ. गीता व्ही. राणवगोळ यांना वैद्यकीय उपचारासाठी ११ हजार रुपये धनसहाय्य देण्यात आले. सभेचे सूत्रसंचालन अजय अंगडी यांनी केले. आभार डॉ. विनोद गायकवाड यांनी मानले. सभेला संस्थेचे संचालक सभासद कर्मचारी वर्ग व हितचिंतक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

हिरण्यकेशी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शहरातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *