
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर राणी चन्नम्मा सर्कल ते शेट्टीमनी दुकानापर्यंतचा जुना पुणे-बेंगळूर (पी. बी.) रोड चौपदरीकरण करण्यात आला आहे. रस्ता चौपदरीकरणाचे काम ठेकेदारांनी अर्धवट कसेबसे केलेले दिसताहे. पोस्ट कार्यालय हरमन टी स्टॉल समोरच्या रस्त्यावरील चर अपघाताला आमंत्रण देणारी ठरल्याचे कुमार बस्तवाडी यांनी आंमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
ते म्हणाले, आमचे लाडके नेते हुक्केरीचे लोकप्रिय आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री दिवंगत उमेश अण्णा कत्ती यांनी जुना पी. बी. रोड चौपदरीकरण कार्याला निधी मिळवून देण्याचे कार्य केले आहे. रस्ता ठेकेदारांनी रस्त्याचे काम व्यवस्थित करायला हवे आहे. रस्ता मधोमध दुभाजकाची रिकामी जागा तशीच सोडुन देण्यात आली आहे. आता येथे खड्डे निर्माण होताना दिसत आहेत. त्यामुळे येथे छोटे-मोठे अपघात घडत आहेत. पोस्टा नजिकच्या रस्त्यांची चर ताबडतोब बुजविण्याचे काम हाती घेण्याबरोबर चन्नम्मा सर्कल ते शेट्टींमनी दुकानापर्यंतचा चौपदरी रस्ता व्यवस्थित करायला हवे असल्याचे त्यांनी सांगितले. हरमन टी स्टॉल नजीकच्या रस्त्यावर निर्माण झालेली चर अपघाताला निमंत्रण देणारी ठरली असून येथे वाहनांची धडामधुडकी चाललेले चित्र पहावयास मिळत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta