Tuesday , March 3 2026
Breaking News

संकेश्वरात वीस रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया

Spread the love

 

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर मुरगुडे मेमोरियल, एम.एम. जोशी नेत्रविज्ञान संस्थेच्या वतीने नुकतीच मोफत नेत्रचिकित्सा शिबिर आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडली. शिबिराचे आयोजन दिवंगत डॉ. श्वेता सचिन मुरगुडे वाढदिवस स्मरणार्थ श्रीमती शैलजा मुरगुडे यांनी केले होते. मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचा लाभ बहुसंख्य लोकांनी घेतला. शिबिरांतर्गत आर्थिकदृष्ट्या मागास गरीब वीस रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्रक्रियेला अर्थसहाय्य श्रीमती शैलजा मुरगुडे यांनी केले. डाॅ. प्रविण राऊत यांनी वीस रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉ. प्रविण राऊत, हाॅस्पिटलचे स्टाफ राजू गुंडकल्ले, संतोष अक्कतंगेरहाळ, बाळू बागी, विलास बागी, राकेश ठाणे, इंम्तीयाज मकानदार, रामचंद्र किंवडा, परिचारिका संगीता, शैला, सरीता यांनी विशेष परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

हिरण्यकेशी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शहरातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *