Thursday , September 19 2024
Breaking News

हिरण्यकेशीला ऊस पुरवठा करा : रमेश कत्ती

Spread the love

 


संकेश्वर (महंमद मोमीन) : हिरण्यकेशी सहकारी साखर कारखाना सभासदांनी हिरण्यकेशीला ऊस पुरवठा करण्याचे कार्य करायला हवे असल्याचे कारखान्याचे मार्गदर्शक बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी खासदार रमेश कत्ती यांनी सांगितले. ते हिरण्यकेशी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. सभेचे अध्यक्षस्थान कारखाना अध्यक्ष निखिल कत्ती यांनी भूषविले होते. सभेच्या प्रारंभी हुक्केरीचे लोकप्रिय आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री दिवंगत उमेश कत्ती आणि दिवंगत महनिय व्यक्तींना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली वाहण्यात आली.

रमेश कत्ती पुढे म्हणाले, हिरण्यकेशी साखर कारखाना सभासदांनी अन्य कारखान्याला ऊस पुरवठा करणे ही चांगली गोष्ट नाहीये. हिरण्यकेशी साखर कारखान्याचे तुम्ही मालक आहात. मालकानीच बेइमानी करावी ही बाब खटकण्यासारखी आहे. एक काळ असा होता हिरण्यकेशीला ऊस पुरवठा करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी अतुर असायचे. बेळगांव जिल्ह्यात साखर कारखानदारी वाढत गेली तशी हिरण्यकेशीला ऊसाची कमतरता भासू लागली आहे. बेळगांव जिल्ह्यात आज २८ साखर कारखान्याने कार्यरत आहेत. हुक्केरी तालुक्यातील तमाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस हिरण्यकेशी साखर कारखाना, संगम साखर कारखाना विश्वराज शुगर्सला पुरवठा करुन आपल्या कारखान्याच्या विकासाला हातभार लावण्याचे कार्य करायला हवे आहे. यावर्षी हिरण्यकेशी साखर कारखान्याने १२ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. हिरण्यकेशी सभासदांचे उद्दिष्टपूर्तीसाठी सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

हुक्केरी तालुका आमचे कुटुंब…
हुक्केरी तालुक्यातील जनतेच्या आशीर्वादाने उमेशअण्णा राजकारणात स्थिरावले. आठ वेळा आमदार आणि चार वेळा मंत्रीपद भूषविले. उमेशअण्णांच्या निधनाने दुखसागरात बुडालेला कत्ती परिवार सावरला तो तुम्हा सर्वांच्या आधाराने. तालुक्यातील जनता आमची खरी शक्ती आहे. उमेश अण्णांच्या विकास कामांची पूर्तता करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

निखिल कत्ती भावूक…
हिरण्यकेशी साखर कारखाना अध्यक्ष निखिल कत्ती आपल्या वडीलांच्या आठवणीने भावूक झालेले दिसले. आमच्या कुटुंबांचा आधारवड हरपल्याचे सांगतांना निखिल कत्ती यांचे डोळे पाणावलेले दिसले. सभेच्या प्रारंभी उपस्थितांचे स्वागत कारखाना संचालक अशोक पट्टणशेट्टी यांनी केले. व्यवस्थापक संचालक सातप्पा कर्किनाईक यांनी विषयपत्रिकेवरील विषयांना मंजुरी घेतली. सभेला कारखाना उपाध्यक्ष श्रीशैलप्पा मगदूम, संचालक शिवनायक नाईक, अप्पासाहेब शिरकोळी, बाबासाहेब आरबोळे, सुरेश बेल्लद, बसवराज कल्लट्टी, प्रभुगौडा पाटील, बाप्पा मरडी, सुरेंद्र दोडलिंगण्णावर, संगम साखर कारखाना अध्यक्ष राजेंद्र पाटील, के. बी पाटील, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, प्रशांत पाटील, नगरसेवक नंदू मुडशी सचिन भोपळे, ॲड. प्रमोद होसमनी, कुमार बस्तवाडी, हुक्केरी विद्युत संघाचे पदाधिकारी, विविध संघ संस्थांचे संचालक, अनेक मान्यवर सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार संचालक सोमगोंडा आरबोळे यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

Spread the love  दड्डी : सलामवाडी ता. हुक्केरी येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित घटप्रभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *