
सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री गजानन सौहार्द क्रेडिट सहकारी संस्थेची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संस्थेचे उपाध्यक्ष दिपक कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या प्रारंभी श्री गजानन सौहार्दचे दिवंगत चेअरमन डी.एन. कुलकर्णी, राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री दिवंगत उमेश कत्ती आणि संस्थेच्या दिवंगत सभासदांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली वाहण्यात आली. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत संचालक मुकूंदराव देशपांडे यांनी केले. अहवाल वाचन संस्थेचे सीईओ ए. पी शांत यांनी केले.
सभेला उद्देशून बोलताना उपाध्यक्ष दिपक कुलकर्णी म्हणाले, चालू आर्थिक वर्षात संस्थेला २४ लाख ४७ हजार रुपये नफा झाला आहे. सभासदांना १० टक्के लाभांश देत आहोत. गेली दोन वर्षे झाली कोरोना माहामारीचा फटका सर्वच सहकारी संस्थांना बसला आहे. त्यामुळे आंमच्या संस्थेच्या नफ्यात थोडीशी घसरण झाली आहे. आमची सहकारी संस्था,शाखा प्रगतीपथावर वाटचाल करीत आहेत. सभासदांना यंदा १० टक्के लाभांश देत आहोत. पुढच्या वर्षी संस्था पूर्वपदावर आणण्याचे काम संचालक मंडळ निश्चितपणे करुन दाखविणार असल्याचे त्यांनी सांगितले. सभेत दहावी बारावी, आणि पदवीधर गुणवंत मुला-मुलींचा सत्कार करण्यात आला.
सभेला संचालक डॉ. गिरीश कुलकर्णी, एम. सी. कुलकर्णी, शामराव पणशीकर, एम. जी. कुलकर्णी, श्रीमती एस. एस. जेरे, श्रीमती ए. ए. कुलकर्णी, एस. आय. गस्ती, ए. बी.कोळी, एस. एस. दवडते, जी.आर. कारंथ, पी. एन. वाळवेकर सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार संचालक डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta