तर उपाध्यक्षपदी डॉ. गिरीश कुलकर्णी यांची बिनविरोध निवड
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री गजानन सौहार्द क्रेडिट सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी दिपक व्ही. कुलकर्णी, उपाध्यक्षपदी डॉ. गिरीश बी. कुलकर्णी यांची उर्वरित कालावधीसाठी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून व्ही. डी. लक्षाणी यांनी काम पाहिले. संस्थेचे दिवंगत चेअरमन डी. एन. कुलकर्णी यांच्या अकाली निधनाने नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. उपस्थितांचे स्वागत ए. पी. शांत (सीईओ) यांनी केले.
यावेळी संचालक मुकूंदराव देशपांडे, एम. सी. कुलकर्णी, शामराव पणशीकर, एम. जी. कुलकर्णी, श्रीमती एस. एस. जेरे, श्रीमती ए. ए. कुलकर्णी, एस. आय. गस्ती, ए. बी. कोळी, एस. एस. दवडते, जी. आर. कारंथ, पी. एन. वाळवेकर उपस्थित होते. संस्थेच्या संचालकांनी नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचे विशेष अभिनंदन केले.
Belgaum Varta Belgaum Varta