
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर ग्रामदेवता श्री महालक्ष्मी मंदिरात आज स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतर्फ कुंकूमार्चन, देवीची विशेष पूजा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सौ. महादेवी पाटील (देसाई), महेश देसाई दांपत्याच्या हस्ते श्री लक्ष्मी देवीची विशेष पूजा करण्यात आली.
कार्यक्रमाला उद्देशून बोलताना सौ. महादेवी पाटील (देसाई) म्हणाल्या महिलांनी आपला जादा वेळ मोबाईलमध्ये न घालविता धार्मिक कार्यातून मुलांवर चांगले संस्कार करण्याचे कार्य करायला हवे आहे. संस्कारसंपन्न युवा पिढीचं देशाचं उज्ज्वल भवितव्य घडविणार आहे. महिला धार्मिक कार्यातून उत्तम समाज घडवू शकतात असे त्यांनी सांगितले.
यावेळी सौ. शर्मिला राजेंद्र पाटील, अनुसया पर्वतराव, स्वरुपा पर्वतराव, ज्योती शिरकोळी, चिन्मयला हंजी, स्वामी विवेकानंद कन्नड माध्यम शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षिका तसेच गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमांतर्गत श्री महालक्ष्मी देवीची विशेष पूजा सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी लोकांना सुख शांती समाधान लाभावे यासाठी करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta