Sunday , December 7 2025
Breaking News

श्री दुर्गामाता दौडचे पालिकेत-शिवाजी चौकात जंगी स्वागत..

Spread the love

 

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात शुक्रवारी श्री दुर्गामाता दौडचे संकेश्वर पालिका आणि शिवाजी लोकांत जंगी स्वागत करण्यात आले. श्री शंकराचार्य संस्थान मठापासून दौडची उत्साही वातावरणात ध्येय मंत्राने सुरुवात करण्यात आली. श्री दुर्गामाता दौडचे आयोजन संकेश्वर श्री शिवप्रतिष्ठान, भगवा रक्षक, श्रीरामसेना, श्रीरामसेना हिंन्दूस्तान, हिन्दू राष्ट्रीय सेना व हिन्दू संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.
संकेश्वर पालिकेत उपनगराध्यक्ष अजित करजगी, नगरसेवक डॉ. मंदार हावळ, जितेंद्र मरडी, डॉ. जयप्रकाश करजगी, चिदानंद कर्देण्णावर, कुमार कब्बूरी, प्रशांत कोळी, मुख्याधिकारी आर. सी. चौगुला यांनी श्री दुर्गामाता दौडचे भक्तीपूर्वक स्वागत केले.
यावेळी पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्रीरामसेना हिंदुस्थानचे शहर अध्यक्ष अमोल गोंधळी यांनी दौडीचे फटाक्यांच्या तुफान आताषबाजीत जल्लोषी स्वागत केले.
यावेळी कन्हैय्या भोसले, दत्ता जाधव, विठ्ठल पाटील, संदिप गोंधळी, मनोहर सुर्यवंशी उपस्थित होते. कुरबर समाजाचे नेते शंकरराव हेगडे, बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गजानन क्वळी, अभिजित कुरणकर, नगरसेवक रोहण नेसरी, मल्लीकार्जुन पट्टणशेट्टी, राजू सुतार, जितेंद्र भोपळे यांनी दौडचे भक्तीमय वातावरणात स्वागत केले. दौडीत छत्रपती शिवाजी महाराज की जय, बसवेश्वर महाराज की जय आणि देवदेवता, राष्ट्रीय पुरुषांचा जयजयकार चाललेला दिसला. दौडमध्ये वैभव शिवणे, अमय भोसले, अक्षय पोवार, नेताजी आगम, ओंकार डावरे, समीर पाटील, सुभाष कासारकर, शाम यादव, पिंटू कारेकर, सचिन मोकाशी, जयप्रकाश सावंत, अभिजित रेळेकर, सर्वेश माने, श्रीजित शिंत्रे,सृष्टी बिजगर्णी, शुभम बागलकोटी, समर्थ नडगदल्ली, पंकज मुळे, संजय पचंडी, बबलू मुडशी, श्रध्दा सावंत, संकल्पिका पोवार, मोहिनी पोवार, वैष्णवी मुळे, कार्तिकी मुळे, शैलजा शिंत्रे, अजित स्वामी, युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दौडची सांगता श्री विठ्ठल मंदिर येथे प्रेरणा मंत्रांने करण्यात आली.
रविवार दि. 2 ऑक्टोबर 2022 रोजी दौडचा मार्गाक्रम असा : श्री शंकराचार्य संस्थान मठ येथून दौडची सुरवात होईल. ढंग गल्ली, कोळेकर गल्ली, श्री साई मंदिर, सोमशेट्टी चाळ, आय.बी.रोड, श्री चांमुडेश्वरी मंदिर, हनुमान नगर ते श्री विठ्ठल मंदिर येथे दौडची सांगता केली जाणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपतीला जनसागर लोटला…

Spread the love  संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपती दर्शनासाठी आज जनसागर लोटलेला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *