संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर श्री नामदेव सौहार्द क्रेडिट सहकारी संस्थेची 22 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच श्री विठ्ठल मंदिरात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दामोदर उंडाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सभेच्या प्रारंभी हुक्केरीचे लोकप्रिय आमदार राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री दिवंगत उमेश कत्ती, नामदेव सौहार्दचे अध्यक्ष दिवंगत पांडुरंग शिंपी आणि मयत सदस्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. उपस्थितांचे स्वागत आणि अहवाल वाचन श्रीमती एस. बी. देवरक्की (सीईओ) यांनी केले.
सभेला उद्देशून बोलताना संचालक श्रीनिवास कोळेकर म्हणाले, श्री नामदेव सौहार्द क्रेडिट सहकारी संस्थेला चालू आर्थिक वर्षात 18 लाख 61 हजार रुपये नफा झाला असून सभासदांना 20 टक्के लाभांश देत आहोत. संस्था प्रगतीपथावर वाटचाल करीत असून गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे संस्थेला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. चालू आर्थिक वर्षात संस्था पुनश्च: पूर्वपदावर येत आहे. यावर्षी नफा थोडासा कमी झालेला असला तरी संस्थेने सभासदांना 20 टक्के लाभांश देण्याचे ठरविले असल्याचे त्यांनी सांगितले. संचालक आनंद काकडे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. सभेला उपाध्यक्ष विजय हावळर, माजी अध्यक्ष कृष्णकांत मुळे, संचालक पी. एम. खटावकर, संजय कोळेकर, गीता विलास उंडाळे, निता सतीश मुळे, सभासद उपस्थित होते. आभार श्रीनिवास कोळेकर यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta