संकेश्वर (महंमद मोमीन) : गुजरात येथील अहमदाबाद कर्नाटक संघाच्या अमृतमहोत्सव वर्धापनदिनानिमित्त येत्या 8 आणि 9 ऑक्टोबर 2022 रोजी कर्नाटक दर्शन 2022 कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आल्याचे कर्नाटक संघाचे डॉ. शिवप्पा गंगाधरप्पा कणगली यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
ते म्हणाले, कर्नाटकातील बरेच लोक गुजरात येथे व्यापार उद्योग व्यवसाय आणि नोकरीकरिता स्थायिक झाले आहेत. त्यांनी 1947 मध्ये गुजरात येथील अहमदाबाद येथे कर्नाटक संघाची स्थापना करुन कर्नाटकची कला-संस्कृती टिकविण्याचे महत्वपूर्ण कार्य चालविले आहे. कर्नाटक संघाने अमृतमहोत्सव वर्धापनदिनानिमित्त येत्या 8 आणि 9 ऑक्टोबर 2022 रोजी कर्नाटक दर्शन भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा 8 ऑक्टोबर 2022 रोजी सन्मानीय अमित शहा यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. दोन दिवशीय कार्यक्रमात कर्नाटकची कला-संस्कृतीचे दर्शन घडवून आणले जाणार आहे. कार्यक्रमात प्रामुख्याने क्लासिक डान्स, क्लासिक म्युझिक, ढोल नृत्य, विरागसे, यक्षगाण, गरुडी गुंबे, तसेच कर्नाटकातील चित्रपटांचा इतिहास दर्शकांसमोर सादर केला जाणार आहे. त्याचबरोबर मेघा गरबा कार्यक्रम सादर केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta