
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिका आणि गांधी चौक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजींची जयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. पालिकेत राष्ट्रपिता महात्मा गांधीजी, देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजींच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक अमर नलवडे, संजय शिरकोळी यांनी केले. यावेळी पालिका सदस्यांनी मुख्याधिकारी आर. सी. चौगुला, अभियंता आर. बी. गडाद यांनी बापूजी, शास्त्रीजींना अभिवादन केले. जयंती उत्सवात नगरसेवक सचिन भोपळे, गंगाराम भूसगोळ, ॲड. प्रमोद होसमनी, डॉ. जयप्रकाश करजगी, विवेक क्वळी, हारुण मुल्ला, नंदू मुडशी, रोहण नेसरी, जितेंद्र मरडी, चिदानंद कर्देण्णावर, विनोद नाईक, नगरसेविका श्रीविद्या बांबरे, मनोरमा सुगते, रिजवाना रामपूरे, माजी नगरसेवक पिंटू परीट, महेश सुगते, कुमार कब्बूरी, पालिकेचे कर्मचारी सहभागी झाले होते. दरम्यान संकेश्वरातील गांधी चौक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजींची जयंती प्रतिमा पूजनाने साजरी करण्यात आली. येथे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अमर नलवडे, प्रकाश फडी यांनी बापूजी-शास्त्रीजींच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले.
यावेळी अजित वाळकी, प्रकाश खंडागळे, सुभाष कासारकर, नेताजी आगम, जयप्रकाश सावंत, सचिन सपाटे, मुरलीधर बडीगेर, उपस्थित होते. शासकीय कार्यालय, सहकारी संस्था आणि शाळा-महाविद्यालयात बापूजी-शास्त्रीजींची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta