
संकेश्वर (महंमद मोमीन) : मुलांना संस्कारसंपन्न घडविणेचे कार्य स्वामी विवेकानंद कन्नड माध्यम शाळेने हाती घेतल्याचे सौ. स्वप्नाली गणेश हुक्केरी यांनी सांगितले. संकेश्वर विश्वचेतन विद्या संस्था संचलित स्वामी विवेकानंद कन्नड माध्यम शाळेच्या नवरात्र उत्सव कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संकेश्वर नेसरी गार्डन डिलक्स येथे आयोजित नवरात्र उत्सव कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वामी विवेकानंद शाळेच्या कार्यदर्शी महादेवी पाटील यांनी भूषविले होते. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत सविता मडिवाळ यांनी केले.
स्वप्नाली हुक्केरी पुढे म्हणाल्या, स्वामी विवेकानंद शाळेने शिक्षणाचा बाजार होऊ दिलेला नाही. ही गोष्ट निश्चितच कौतुकास्पद आहे. अशी शाळा निपाणी भागात असती तर आपण मुलांना तेथेच दाखल केले असते. मुलांना संस्कारसंपन्न घडविणेचे कार्य पालकांनी देखील करायला हवे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना भाजपा महिला घटक अध्यक्षा शांभवी अश्वथपूर म्हणाल्या, महिलांनी मुलांना संस्कारसंपन्न घडविणेची जबाबदारी स्वीकारायला हवी असल्याचे सांगितले. अध्यक्षस्थानी बोलताना महादेवी पाटील म्हणाल्या, आमच्या शाळेचा संकेश्वर भागात नावलौकिक राहिला आहे. मुलांना शिस्तबद्ध पद्धतीने शिक्षण देणे हे कठीण काम असले तरी आंम्ही ते निष्ठेने प्रामाणिकपणे पार पाडत आहोत. आज प्रमुख पाहुण्यांनी आंमच्या शिक्षण संस्थेच्या कार्याची पोचपावती दिल्याचे त्यांनी सांगितले. नवरात्र उत्सव कार्यक्रमाला प्रभारी पोलिस उपनिरीक्षक महालक्ष्मी कोरेण्णावर, जोती शिरकोळी, राजेश्री मुडशी, सरोजा महाळंक, नागरत्ना पाटील, हेमलता वाली, लक्ष्मी संसुध्दी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
उद्घाटन सोहळ्यानंतर महिलांचा बहारदार दांडिया कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता मडीवाळ यांनी केले. आभार विद्या हुल्लोळी यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta