

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात सोमवार दि. ३ ऑक्टोबर रोजी श्री दुर्गामाता दौडचे परीट गल्लीत नगरसेविका सौ. सुचिता परीट, माजी नगरसेवक पिंटू परीट आणि गल्लीतील महिलांनी दौडचे भक्तीमय वातावरणात स्वागत केले. अंकले वेस येथे श्रीरामसेना हिंदुस्थान, हनुमान तरुण मंडळाने स्वागत कमानी उभारुन, जल्लोषात स्वागत केले. येथे सुवासिनी महिलांनी छत्रपती शिवाजी महाराज, संगोळी रायण्णा, संभाजी महाराज, बसवेश्वर महाराजांची सजावट आणि आरस करुन भक्तीपूर्वक दौडचे स्वागत केले. मड्डी गल्ली श्री दुर्गामाता नवरात्र उत्सव मंडळाच्यावतीने नगरसेवक डॉ. मंदार हावळ यांनी दौडचे उत्स्फूर्तपणे जंगी स्वागत केले.
यावेळी मारुती उमरानी, संतोष मगदूम, महेश मिल्के, कार्यकर्ते उपस्थित होते. संसुध्दी गल्लीत श्रीरामसेनेचे हुक्केरी तालुका अध्यक्ष सुभाष कासारकर यांनी स्वागत कमानी उभारुन, बेन्जोच्या निनादात जंगी स्वागत केले. येथे नगरसेवक चिदानंद कर्देण्णावर, संतोष केरीमनी, ॲड. प्रविण नेसरी, महेश क्वळी, कार्यकर्ते उपस्थित होते. गाडगी गल्लीत ॲड. प्रविण नेसरी अभिजित शिरकोळी, प्रतिक पाटील, राम क्वळी यांनी दौडचे स्वागत केले. माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अमर नलवडे यांनी श्री दुर्गामाता दौडमध्ये आपला सहभाग दर्शविला. युवानेते संदिप दवडते यांनी दौडचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले.
श्री शंकराचार्य संस्थान मठ येथून दौडची उत्साही वातावरणात ध्येय मंत्राने सुरुवात करण्यात आली. श्री दुर्गामाता दौडचे आयोजन संकेश्वर श्री शिवप्रतिष्ठान, भगवा रक्षक, श्रीरामसेना, श्रीरामसेना हिंन्दूस्तान, हिन्दू राष्ट्रीय सेना व हिन्दू संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे. आठव्या दिवशी दौडचा मार्गाक्रम श्री शंकराचार्य संस्थान मठ ते बेळवी गल्ली, परीट गल्ली, अंकले वेस, मड्डी गल्ली, संसुध्दी गल्ली, माळी गल्ली, तहसीलदार गल्ली, दत्त मंदिर, कासार गल्ली येथून श्री विठ्ठल मंदिर येथे प्रेरणा मंत्रांने दौडची सांगता करण्यात आली. दौडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय, बसवेश्वर महाराज की जय, देवदेवता आणि राष्ट्रीय पुरुषांचा जयजयकार चाललेला दिसला. दौडमध्ये वैभव शिवणे, अमय भोसले, अक्षय पोवार, नेताजी आगम, ओंकार डावरे, समीर पाटील, सुभाष कासारकर, शाम यादव, पिंटू कारेकर, सचिन मोकाशी, जयप्रकाश सावंत, अभिजित रेळेकर, सर्वेश माने, श्रीजित शिंत्रे, सृष्टी बिजगर्णी, शुभम बागलकोटी, समर्थ नडगदल्ली, पंकज मुळे, संजय पचंडी, बबलू मुडशी, श्रध्दा सावंत, संकल्पिका पोवार, मोहिनी पोवार, वैष्णवी मुळे, कार्तिकी मुळे, शैलजा शिंत्रे, अजित स्वामी, युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta