
संकेश्वर (महंमद मोमीन) : कणगला-तवंदी फाटा येथील राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी ३.३० वाजता टाटा एस स्किड होऊन पलटी होऊन झालेल्या अपघातात टाटा एस चालक तानाजी बसवाणी घोडचे (वय ४५) राहणार निपाणी जागीच ठार झाला आहे.
अपघाताची पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, अपघाता दरम्यान सदर मार्गावरुन मोलायसीसी वाहतूक करणारा ट्रक मोलायसीस सांडत पुढे निघून गेल्याने रस्ता थोडासा घसरड झाला होता. त्यामुळे भरधाव वेगाने निघालेली मोटार कार तीन-चार पलटी होऊन रस्त्याशेजारी कलंडली. सुदैवाने कारमधील एअर बॅग खुले झाल्यामुळे कारमधील चालक आणि मालक बचावले. टाटा एस वाहन स्किड होऊन जोराने पलटी झाल्याने चालक तानाजी घोडे जागीच ठार झाला. अपघातस्थळी संकेश्वर पोलिसांनी लागलीच धाव घेऊन पलटी झालेल्या कारमधील दोघांना सुखरुप बाहेर काढले. टाटा एस चालक जागीच ठार झाल्याने पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठवून दिले. संकेश्वर पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta