Tuesday , March 3 2026
Breaking News

श्री दुर्गामाता दौडने देशाभिमान जागविला : पवन कत्ती

Spread the love

 

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील श्री दुर्गामाता दौडने युवा वर्गात देशाभिमान जागविण्याचे महत्वपूर्ण कार्य केल्याचे माजी जिल्हा पंचायत सदस्य पवन कत्ती यांनी सांगितले. ते मंगळवारी श्री दुर्गामाता दौडच्या सांगता कार्यक्रमात सहभागी होऊन बोलत होते. पवन कत्तीं, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक संजय शिरकोळी, संकेश्वर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी यांनी ध्वज घेऊन दौडमध्ये आपला सहभाग दर्शविला.

पवन कत्ती पुढे म्हणाले, श्री दुर्गामाता दौडने छोट्या मुलांत आणि युवा वर्गात धर्माभिमान जागवून, व्यसनापासून अलिप्त राहणेचा संदेश दिला आहे. त्यामुळे श्री दुर्गामाता दौड कार्यक्रम आयोजकांचे विशेष अभिनंदन करायला हवे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक संजय शिरकोळी, नंदू मुडशी, डॉ. मंदार हावळ, सचिन भोपळे, राजेंद्र बोरगांवी, प्रदीप माणगांवी, कुमार बस्तवाडी, सचिन सपाटे उमेश फडी, जयप्रकाश सावंत, दौडमध्ये सहभागी मुले-मुली युवक उपस्थित होते. दौडच्या ९ व्या दिवशी श्री दुर्गामाता दौडचे सर्वत्र उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. शंकराचार्य संस्थान मठापासून दौडची उत्साही वातावरणात ध्येय मंत्राने सुरुवात करण्यात आली. श्री दुर्गामाता दौडचे आयोजन संकेश्वर श्री शिवप्रतिष्ठान, भगवा रक्षक, श्रीरामसेना, श्रीरामसेना हिंन्दूस्तान, हिन्दू राष्ट्रीय सेना व हिन्दू संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे. दौडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय, बसवेश्वर महाराज की जय, देवदेवता आणि राष्ट्रीय पुरुषांचा जयजयकार चाललेला दिसला. दौडमध्ये वैभव शिवणे, अमय भोसले, अक्षय पोवार, नेताजी आगम, ओंकार डावरे, समीर पाटील, सुभाष कासारकर, शाम यादव, पिंटू कारेकर, सचिन मोकाशी, जयप्रकाश सावंत, अभिजित रेळेकर, सर्वेश माने, श्रीजित शिंत्रे, सृष्टी बिजगर्णी, शुभम बागलकोटी, समर्थ नडगदल्ली, पंकज मुळे, संजय पचंडी, बबलू मुडशी, श्रध्दा सावंत, संकल्पिका पोवार, मोहिनी पोवार, वैष्णवी मुळे, कार्तिकी मुळे, शैलजा शिंत्रे, अजित स्वामी, युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दौडची सांगता श्री विठ्ठल मंदिर येथे प्रेरणा मंत्रांने करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

हिरण्यकेशी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शहरातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *