Tuesday , March 3 2026
Breaking News

श्री दुर्गामाता अदभूत दौड : ए. बी. पाटील

Spread the love

 

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील श्री दुर्गामाता दौडने युवा वर्गात देशाभिमान धर्माभिमान जागविण्याचे अदभूत कार्य केल्याचे माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी सांगितले. ते आज श्री दुर्गामाता दौडच्या सांगता कार्यक्रमात सहभागी होऊन बोलत होते. ए. बी. पाटील यांनी हातात ध्वज घेऊन दौडमध्ये आपला सहभाग दर्शविला. ते पुढे म्हणाले, श्री दुर्गामाता दौडमध्ये छोटी मुले युवक-युवती आणि आयोजकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन गेले दहा दिवस दौडचा कार्यक्रम यशस्वी करुन दाखविला आहे. श्री दुर्गामाता देवता कष्ट निवारणारी आहे. देवीने सर्वांच कष्ट निवारावे हीच आपली प्रार्थना असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बसनगौडा पाटील, प्रकाश नेसरी, बाळासाहेब वैरागी, सुरेश चव्हाण, अप्पा मोरे, जयकुमार पाटील, सुधाकर ओतारी, शशीकांत पाटील, संकेश्वर घटक काॅंग्रेसचे अध्यक्ष संतोष मुडशी, नगरसेवक डॉ. जयप्रकाश करजगी, जितेंद्र मरडी, चिदानंद कर्देण्णावर, विनोद नाईक, ॲड. प्रमोद होसमनी, महेश हट्टीहोळी, ॲड. प्रविण नेसरी, कुमार कब्बूरी, प्रशांत कोळी, मुस्तफा मकांनदार, संतोष सत्यनाईक, शंकर सपाटे, पुष्पराज माने, प्रशांत मन्नीकेरी दौडमध्ये सहभागी मुले-मुली युवक-युवती उपस्थित होते. दौडच्या आजच्या शेवटच्या दिवशी सर्वत्र उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. शंकराचार्य संस्थान मठापासून दौडची उत्साही वातावरणात ध्येय मंत्राने सुरुवात करण्यात आली. श्री दुर्गामाता दौडचे आयोजन संकेश्वर श्री शिवप्रतिष्ठान, भगवा रक्षक, श्रीरामसेना, श्रीरामसेना हिंन्दूस्तान, हिन्दू राष्ट्रीय सेना,व हिन्दू संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे. दौडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय, बसवेश्वर महाराज की जय, देवदेवता आणि राष्ट्रीय पुरुषांचा जयजयकार चाललेला दिसला. दौडमध्ये वैभव शिवणे, अमय भोसले, अक्षय पोवार, नेताजी आगम, ओंकार डावरे, समीर पाटील, सुभाष कासारकर, शाम यादव, पिंटू कारेकर, सचिन मोकाशी, जयप्रकाश सावंत, अभिजित रेळेकर, सर्वेश माने, श्रीजित शिंत्रे, सृष्टी बिजगर्णी, शुभम बागलकोटी, समर्थ नडगदल्ली, पंकज मुळे, संजय पचंडी, बबलू मुडशी, श्रध्दा सावंत, संकल्पिका पोवार, मोहिनी पोवार, वैष्णवी मुळे, कार्तिकी मुळे, शैलजा शिंत्रे, अजित स्वामी, युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दौडची सांगता श्री विठ्ठल मंदिर येथे प्रेरणा मंत्रांने करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

हिरण्यकेशी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शहरातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *