
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील सर्व प्रभागात विकासकामे करण्यासाठी नगरोथान योजनेतून ३.५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. सदर विकास कामांचा शुभारंभ नुकताच नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक संजय शिरकोळी, अमर नलवडे, डॉ. जयप्रकाश करजगी, नगरसेविका शेवंता कब्बूरी, श्रीविद्या बांबरे, रिजवाना रामपूरे, तसेच अन्य सर्व पालिका सदस्यांच्या हस्ते कुदळ मारुन करण्यात आला.
नगरसेवक-नगरसेविकांनी आपापल्या प्रभागात पूजाविधी कार्यक्रमाने विकास कामांना चालना दिली. यावेळी नगरसेवक ॲड. प्रमोद होसमनी, गंगाराम भूसगोळ, सचिन भोपळे, नंदू मुडशी, रोहण नेसरी, विवेक क्वळी, चिदानंद कर्देण्णावर, विनोद नाईक, जितेंद्र मरडी, डॉ. मंदार हावळ, नगरसेविका संगिता कोळी, लता मरडी, मुख्याधिकारी आर. सी. चौगुला, अभियंता आर. बी. गडाद, कुमार कब्बूरी, उमेश फडी प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
तुरुंगातून विकास कामे..
प्रभाग क्रमांक १४ चे नगरसेवक उमेश कांबळे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा पालिका सभेत आपला सहभाग दर्शवून प्रभागातील समस्या मांडल्या. त्यांनी प्रभागात विकासकामे करण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रभाग क्रमांक १४ मध्ये विकास कामांचा नारळ नगरसेवक संजय शिरकोळी, उमेश फडी यांनी फोडला आहे.
विकास कामांत प्रभाग १० चा समावेश नाही
संकेश्वरातील सर्व २३ प्रभागात विकासकामे करण्यासाठी नगरोथान योजनेतून ३.५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. प्रत्येक प्रभागातील महत्वपूर्ण कामे कामांना प्राधान्य देऊन गटार रस्ते पेवर ब्लॉगचे काम केले जाणार आहे. संकेश्वरातील २३ पैकी २२ प्रभागात विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक १० मध्ये मात्र विकास कामांचा नारळ फोडण्याचे काम राहून गेल्याने त्याची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. येथील नगरसेविका सौ. सुचिता परीट, माजी नगरसेवक पिंटू परीट विकास कामांत मागे का? असा प्रश्न विचारला जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta