
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात नुकतीच खुली रोलर स्केटिंग स्पर्धा पार पडली. त्याला स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. हुक्केरी तालुका रोलर स्केटिंग अकॅडमी, शाखा संकेश्वरच्या वतीने खुल्या रोलर स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संकेश्वर अकॅडमीच्या स्केटरनी स्पर्धेत सहभागी होऊन घवघवीत यश मिळवले आहे. स्पर्धेचे उदघाटन हिरण्यकेशी साखर कारखान्याचे व्यवस्थापक संचालक सातप्पा कर्किनाईक यांनी केले. स्पर्धेला चालना नगरसेवक शिवानंद मुडशी, रोहन नेसरी यांनी दिली. स्पर्धेतील विजेत्या स्केटरना संकेश्वर पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी, डॉ.रमेश दोडभंगी, डॉ. सुनील आळतेकर, कुमार बस्तवाडी, सचिन सपाटे, कल्याणकुमार निलाज, समीर पाटील, सचिन मोकाशी यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. अकॅडमीच्या अध्यक्षा सौ. संगिता कल्याणकुमार निलाज यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करुन आभार मानले. त्यांनी विजेत्या स्केटरना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा प्रदान केल्या. संकेश्वरात इनलाईन, क्वाड व टेनासीटी. 500 मी. स्पर्धा घेण्यात आली. विविध गटात घेण्यात आलेल्या स्पर्धेत गीता मठपती, राही निलाज, आन्वी गुरव, प्रितम निलाज, संचिता बोरे, कृष्णा बस्तावाडी, सप्तमी हिरेमठ, तनिष्का आळतेकर, वीर मोकशी, प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. द्वितिय क्रमांकाचे बक्षिस
विवेक दोडभंगी, दर्शन शेलार, यश आलतेकर, स्वराज सपाटे, कृष्णासिंग राजपूत यांनी पटकाविले. तृतिय क्रमांकावर कार्तिक मोकाशी ऋषिकेश वैरागी, प्राप्ती हिरेमठ यांना समाधान मानावे लागले. स्पर्धेचे नियोजन पालकांनी केले होते. विजेत्या स्केटरना प्रशिक्षक अजितसिंग शिलेदार आणि पालकांचे बहुमोल सहकार्य लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta