संकेश्वर (महंमद मोमीन) : प्रभागातील लोकांना आश्वासनाच्या झुल्यावर झुलवत ठेवण्याचे काम आपण कदापी करणार नाही. नगरोथान योजनेतून निधी मिळवून विकास कामांना चालना देऊनच आपण विकास कामांचा नारळ फोडणार असल्याचे प्रभाग क्रमांक १० मधील नगरसेविका सौ. सुचिता श्रीकांत परीट यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
त्या म्हणाल्या, प्रभाग १० मधील कोण-कोणती कामे नगरोथान निधीतून हाती घ्यावयाची आहेत. त्याची यादी आपण मुख्याधिकारी आर. सी. चौगुला यांना दिली आहे. निधी मंजूर झालेला आहे. विकास कामे हाती घेतल्यानंतर श्रीफळ वाढवून विकास कामांना आपण चालना देणार आहे. अंकले वेस ते काकडे यांच्या घरा दरम्यानचा रस्ता पेवर ब्लॉग ऐवजी डांबरीकरण करण्याची मागणी तेथील लोकांनी केली आहे. त्याविषयी आपण अधिकारींना सांगितले आहे. नगरोथान योजनेतून प्रभाग १० साठी निधी मंजूर झाला आहे. कामे हाती घेऊनच विकास कामांचा नारळ फोडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta