बेळगाव : हुक्केरी मतदार संघावर गेल्या कित्येक वर्षांपासून वर्चस्व असलेल्या कत्ती कुटुंबियांच्या तिसऱ्या पिढीला जनतेने आमदारकी बहाल केली असून दिवंगत मंत्री उमेश कत्ती यांचे सुपुत्र निखिल कत्ती यांनी या निवडणुकीत विजयश्री मिळविली आहे. विश्वनाथ कत्ती यांच्यानंतर उमेश कत्ती आणि आता निखिल कत्ती अशा पद्धतीने तिसऱ्या पिढीने राजकारणात यशस्वी प्रवेश केला असून कत्ती कुटुंबातील तिसऱ्या पिढीला मतदार संघातील जनतेने आमदारकी बहाल केल्याचे स्पष्ट झाले आहे. दिवंगत मंत्री उमेश कत्ती यांचे अकाली निधन झाल्याने भाजपने निखिल कत्ती यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. निखिल कत्ती यांनी काँग्रेसचे ए. बी. पाटील यांचा पराभव केला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta