रायगड (नरेश पाटील) : मूळचा संकेश्वर येथे राहणारा शिवप्रेमी तरुण युवक ओंकार भिसे रायगड किल्ले येथे शुक्रवार दि. ०२ रोजी गड किल्ला चढताना त्याचा वाटेतच मृत्यु झाला. सदर युवक हा महाराष्ट्र सरकार आयोजीत शिवराज्यभिषेक सोहळा कार्यक्रमाकरीता आला होता. मात्र त्याचा मृत्यू झाला. तर सदर युवकाला महाराष्ट्र शासनातर्फे आर्थिक मदत देण्यात यावी म्हणून जोरदार मागणी शिवप्रेमींकडून करण्यात येत आहे. सदर युवकाचे संपूर्ण नाव आहे ओंकार दीपक भिसे असे आहे. तो अवघ्या वय २१ वर्षाचा होता. त्याच बरोबर भिसे कुटुंबातील तो एकुलता एक मुलगा आहे. बेळगाव जिल्ह्यातील संकेश्वर गावाचा राहणारा होता.
रायगड किल्ल्यावर चढताना त्याच्या छातीत दुखू लागल्याने पुढील उपचारासाठी त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे उपचार चालू असताना त्याची तब्येत आणखी खालावल्याने त्याला महाड शासकीय रुग्णालयात नेत असताना त्याचा प्राणज्योत मालवली. ओंकार दीपक भिसे हा युवक शिवप्रेमी भक्त होता. तर या झालेल्या दुःखद घटनेची तात्काळ नोंद घेऊन महाराष्ट्र सरकारने आर्थिक नुकसानची मदत देऊ करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta