हुक्केरी : ट्रॅक्टर चोरी प्रकरणी हुक्केरी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
हुक्केरी तालुक्यातील गौडवाड गावातून महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर चोरीला गेला. याप्रकरणी हुक्केरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी आता ट्रॅक्टर चोरांना अटक केली आहे.
पीआय एम. एम. तहसीलदार, बेळगावचे एसपी आणि अतिरिक्त एसपीएम वेणुगोपाल, डीएसपी दुडपीठ एच. मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकरणाचा छडा लावून दोन आरोपींना अटक करण्यात आली.
अटक केलेल्यांकडून चोरीस गेलेले महिंद्रा कंपनीचे २,५०,००० रुपये किमतीचे ट्रॅक्टर जप्त केले असून गुन्ह्याचा छडा लावण्यात यश आले आहे.