संकेश्वर : डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील संकेश्वरजवळील निडसोसी प्राथमिक आरोग्य केंद्रात बाळंतिणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यानंतर रुग्णवाहिकेतून तिचा मृतदेह पोलीस ठाण्यात आणून कुटुंबीयांनी धरणे धरली.
याब6समजलेली अधिक माहिती अशी की, 24 वर्षीय किरण महादेव टिक्के ही हुक्केरी तालुक्यातील कोनकेरी येथील महिला, बारा दिवसांपूर्वी तिने सिझेरियनद्वारे मुलाला जन्म दिला होता आणि 2 ऑगस्ट रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर ती महाराष्ट्रातील गिजवणे गावात तिच्या माहेरी गेली होती. तिची प्रकृती आज अचानक खालावली. त्यामुळे तिला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारांचा उपयोग न होता तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी प्रसूतीवेळी निष्काळजीपणा केल्याचे खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे कुटुंबीयांनी रुग्णवाहिकेतून तिचा मृतदेह संकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये आणून निषेध केला. दरम्यान, पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठवला असून त्याचा अहवाल आल्यानंतर सर्व वस्तुस्थिती समोर येईल. संकेश्वर पोलिसांना या प्रकरणी पीडितांना न्याय द्यावा लागणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta