Sunday , December 7 2025
Breaking News

डेंग्यूमुळे संकेश्वर येथे ९ वर्षीय मुलीचा मृत्यू

Spread the love

 

संकेश्वर : संकेश्वर येथील एका चिमुरडीचा डेंग्यूच्या आजाराने गुरुवारी मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

श्रेया कृष्णा दवदते नावाच्या ९ वर्षीय मुलीचा या डेंग्यू आजाराने मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे, मात्र आरोग्य विभाग आणि बीआयएम रुग्णालयाच्या डॉक्टरांनीच या मुलीच्या मृत्यूचे नेमके कारण न सांगता मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. गेल्या काही दिवसांपासून मुलीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार न झाल्याने मुलगी बेशुद्ध पडल्याचे कळले. मुलीच्या निधनामुळे नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे.

About Belgaum Varta

Check Also

संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपतीला जनसागर लोटला…

Spread the love  संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरातील नवसाला पावणाऱ्या निलगार गणपती दर्शनासाठी आज जनसागर लोटलेला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *