दड्डी : सलामवाडी ता. हुक्केरी येतील एम ए पाटील यांच्या शेतात मशागत करत असताना जखमी मोर सापडला.
शेतात मक्का पिकाला लागवड टाकत असताना त्यांचे चिरंजीव उदय पाटील यांच्या समोर झाडावरून अचानक भला मोठा पक्षी खाली पडला. त्यांनी हातातील काम सोडून पाहिले तर राष्ट्रीय पक्षी मोर खाली पडला होता. तो जखमी अवस्थेत होता त्याला चालता येते नव्हते त्याच्या पायाला जखम झाली होती. लागली उदय पाटील यांनी वनरक्षक ड्युटीवर असणारे महादेव मांग, बसवराज कांबळे यांना कळविले. त्या घटना ठिकाणी आले. मोराला प्रथम उपचार व वन वनरक्षकाकडे स्वाधीन वनरक्षक यांनी अधिकाऱ्यांना कळवळे लगेंच अधिकारी प्रसन्न बेल्लद (आर एफ ओ), प्रभू तंगडी (आर एफ ओ), रमेश कमटे यांनी त्या राष्ट्रीय पक्षाला प्रथम उपचार करून जिल्हा प्राणी संग्रहालय या ठिकाणी घेऊन गेले.