दड्डी : शट्टिहळ्ळी ता. हुक्केरी येथील घटप्रभा नदीला पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. तालुक्यातील पावसाची संततधार वाढली असून शट्टिहळ्ळी -मरणहोळ पूल दिवसभराच्या पावसामुळे पाण्याखाली गेला आहे. आज दिवसभर जोरात पडत आसलेल्या या पावसामुळे बंधाऱ्यावर पाणी आले असून बंधारा पाण्याखाली गेला आहे. गेल्या 15 दिवसापासुन मोदगा बंधारा पाण्याखाली गेला आहे. मरणहोळ गावातील शाळेची मुले दोन दिवस शाळेला जाणे शक्य नाही कारण मरणहोळ ते मोदगे 7 कि.मी. अंतर आहे त्यामुळे शाळेचे शिक्षक स्वतः त्या मुलांना गाडीने शट्टिहळ्ळी मार्गे शाळेला आणणे व परत घरी पोचवण्याचे काम करत आहेत. आज संध्याकाळी 5.30 वा शट्टीहळ्ळी बंधारा बुडालाने मरणहोळ लमानवाडा गावाचा शट्टीहळ्ळीशी संपर्क तुटला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta