Tuesday , March 3 2026
Breaking News

संकेश्वर नगरपालिका प्रभाग क्रमांक 21ची पोटनिवडणूक रंगणार

Spread the love

 

संकेश्वर : नगरपालिकेच्या प्रभाग क्र. 21 मधील नगरसेवक जितेंद्र मर्डी यांचे निधन झाल्याने त्या रिक्त जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. यामुळे सदर निवडणूक चुरशीची होणार. 23 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या या पोटनिवडणुकीसाठी ॲड. विक्रम करणिग, माजी नगरसेवक गंगाराम भुसगोळ, रवींद्र कांबळे व स्वर्गीय नगरसेवक जितेंद्र मर्डी यांच्या कुटुंबीयातील एक जण निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करणे आणि पाठीमागे घेतल्यानंतरच याबाबत चित्र स्पष्ट होणार आहे. पालिकेत एकूण 23 नगरसेवक असून सत्ता मात्र भारतीय जनता पक्षाच्या अधिपत्याखाली आहे. दिनांक 4 ते 11 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणे, 12 रोजी छाननी, 14 रोजी अर्ज मागे घेणे, 23 रोजी मतदान यानंतर निवडणूक रिंगणातील चित्र स्पष्ट दिसेल. विशेषतः ॲड. विक्रम करणिंग व भाजपाचे गंगाराम भुसगोळ यांच्यात चुरशीची लढत होणार हे नक्की.

About Belgaum Varta

Check Also

हिरण्यकेशी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू

Spread the love  संकेश्वर : संकेश्वर शहरातील हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्यातील क्रशिंग बेल्टमध्ये अडकून कामगाराचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *