संकेश्वर : हरगापुरगड येथील मानसिक त्रासाला कंटाळून युवकाने दारुच्या नशेत घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली. अनिल विश्वनाथ भोसले (वय 30) असे त्यांचे नांव आहे. अनिल याने लोकांकडून उसने पैसे घेतले होते. काही वर्षापासून तो दारुच्या आहारी गेला होता. दारु पिऊ नकोस म्हणून कुटुंबातील त्याला सांगत होते. मात्र त्यांनी दारु सोडली नव्हती. घटनेची नोंद संकेश्वर पोलीस ठाण्यात झाली आहे. त्यांच्या पश्चात आई -वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.