हुक्केरी : हुक्केरी शहरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या चोरीच्या दोन गुन्ह्यांची उकल करण्यात हुक्केरी पोलीस निरीक्षक महांतेश बसापुरे यांना यश आले आहे.
शहरातील बुद्ध बसव आंबेडकर सहकारी संस्था व किराणा दुकानात झालेल्या चोरी प्रकारचा छडा ४८ तासांत लावून आरोपीला पकडून हुक्केरी न्यायालयाच्या ताब्यात दिले. बेळगावचे पोलीस अधीक्षक भीमा शंकर गुळेद यांनी चोरीची घटना गांभीर्याने घेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करून हुक्केरी शहरातील स्वामी विवेकानंद नगरातील रहिवासी राघवेंद्र शिवशंकर दोडमणी (वय २६) याला अटक करून न्यायालयाच्या ताब्यात दिले. अटक केलेल्यांकडून पाच हजार रुपये रोख आणि चोरीत वापरलेली एक लाख रुपयांची बजाज पल्सर दुचाकी जप्त करण्यात आली आहे. बेळगावचे अतिरिक्त एसपी श्रुती व रामगोंडा बसरगी व गोकाक डीएसपी डी एच मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील कर्मचारी चंद्रशेखर गस्ती, ए एस सनदी, रवी धंग, मंजू कब्बुरी, अजित नाईक, रमेश हणमन्नवर, कुमार करेन्नावर आणि बसवराज नावी यांचा समावेश आहे. बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक भीमा शंकर गुळेद यांनी या कारवाईत सहभागी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.