संकेश्वर : संकेश्वर नगरपालिकेची मंगळवारी बैठक संपन्न झाली. यावेळी बैठकीत विविध विषयांवर चर्चा व निधी मंजूर करण्यात आला. पालिकेतर्फे एससी एसटी विद्यार्थ्यांना लॅपटॉप वितरण करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापतीपदी म्हणून प्रमोद होसमणी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी यांच्यावतीने होसमणी यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीत मुख्याधिकारी प्रकाश मठद, अभियंता रवींद्र गडाद, नगराध्यक्षा सीमा हतनुरी, उपनगराध्यक्ष विवेक क्वळी, सभापती प्रमोद होसमणी, नगरसेवक सुनील पर्वतराव, अमर नलवडे, नंदू मुडशी, दिलीप होसमणी गंगाराम भोसगोळ, सचिन भोपळे, अविनाश नलवडे, चिदानंद कर्दनावर, अजित करजगी, विनोद नाईक, तबरेज हजरतभाई, महेश हट्टीहोळी, नगरसेविका श्रीविद्या बांबरे, सुचित्रा परीट, शेवंता कब्बुरी, संगीता कोळी, रिजवाना रामपुरे उपस्थित होते.