संकेश्वर : जवळच असलेल्या निडसोशी गेटसमोरील बेकरी शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाल्याची घटना आज दुपारी घडली.
मंड्या येथील उमेश नावाच्या व्यक्तीच्या बेकरीमध्ये दुपारी जेवण बनवताना शॉर्टसर्किट होऊन बेकरीमध्ये तयार केलेली मशिनरी व विविध फराळाचे साहित्य जळून खाक झाले असून 10 लाखांहून अधिक नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच मालक उमेश यांनी सर्व कामगारांना सुखरूप बाहेर काढल्याने संभाव्य अनर्थ टळला आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझवली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेची माहिती घेतली. या घटनेचे मुख्य कारण म्हणजे सुरक्षा उपायांचा अभाव.