संकेश्वर : गोंधळी समाजातर्फे सुभाष रोड कमतनुर वेस नजीक लोकवर्गणीतून उभारण्यात आलेले तुळजाभवानी मंदिराची वास्तुशांती मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहन सोहळा ता. २ मार्च ते ६ मार्च अखेर होणार आहे.
हुक्केरी तालुक्यात हे एकमेव तुळजाभवानीचे मंदिर उभारले असून लोकापूर (बागलकोट) येथील मूर्तिकार शिवानंद बडगेर यांनी “३९” इंच उंचीची देवीची मूर्ती बनविली आहे अशी माहिती रामचंद्र भोसले व केशव सुगते यांनी दिली.
ता. २ शंकराचार्य मठापासून प्रमुख मार्गावरून मूर्तीची मिरवणूक काढण्यात येईल ता. ३ धार्मिक विधी ता. ४ वास्तुशांती ता. ५ होम पूजा ता. ६ कळसारोहन व मूर्ती प्रतिष्ठापना शंकराचार्य मठाधिपती श्री. सचिदानंद अभिनव विद्या नरसिंह भारती स्वामी (संकेश्वर), पंचम शिवलिंगेश्वर स्वामी (नीडसोशी), भगवान गिरी महाराज(नुल), मंजुनाथ स्वामी (क्यार गुड), पूर्णानंद काजवे (कोगनोळी) यांच्या दिव्य सानिध्यात तर आमदार निखिल कत्ती यांच्या अध्यक्षतेखाली. पालकमंत्री सतीश जारकीहोळी हस्ते उद्घघाटन होईल.