
कोल्हापूर : कोल्हापुर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावाच्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामपंचायत सदस्याचा निर्घृण खून करून मृतदेह संकेश्वरजवळ हिरण्यकेशी नदीत फेकून देण्यात आले. लखन बेनाडे असे ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे.
मागील आठ दिवसांपासून बेनाडे हे बेपत्ता होते, बेनाडे यांच्या शरीराचे दोन तुकडे करून मृतदेह कर्नाटकमधील हिरण्यकेशी नदीत फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बेनाडे यांच्या खून प्रकरणी चार संशयतांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले आहे.
लखन बेनाडे यांचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. मागील काही महिन्यांपासून दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते, त्यांच्या वादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामधून ही हत्या झाल्याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
मृतदेहाचे दोन तुकडे, अर्धवट जाळले अन् नदीत फेकले
दरम्यान, मारेकर्यांनी पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने बेनाडे यांचा मृतदेहाचे दोन तुकड्यांत तोडले, अर्धवट जाळला आणि हिरण्यकेशी नदीत संकेश्वरजवळ फेकून दिला. बेनाडे आठ दिवसांपासून बेपत्ता होते, आणि ही घटना सुमारे पाच ते सहा दिवसांपूर्वी घडल्याचा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे रांगोळी आणि परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे. बेनाडे यांच्या बेपत्त्याबाबत त्यांची बहीण नीता उमाजी तडाखे गावभाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

Belgaum Varta Belgaum Varta