
दड्डी : सलामवाडी ता हुक्केरी येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त 1992- 93 बॅचच्या इयत्ता 7वीच्या माजी विद्यार्थ्यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या भोजन सामग्रीची अडचण ओळखून दूर करण्यासाठी पुढाकार घेऊन सरकारी मराठी मुलांची शाळा सलामवाडी या शाळेला फ्रीज सप्रेम भेट देण्यात आली. तसेंच गावातील घटप्रभा हायस्कूल सलामवाडी येते वीस लिटरचे कुकर दिले भेट दिली. ज्या शाळेतून आपण शिकून गेलो त्या शाळेविषयी वाटणारी आपुलकी, प्रेम, जिव्हाळा आणि तळमळ त्यांच्या कार्यातून दिसून येते. “आधी केले मग सांगितले” या उक्तीप्रमाणे त्यांनी दिलेले योगदान हे वाखणण्यासारखे आहे. ज्या शाळेतून आपण शिकून गेलो त्या शाळेचा आपले जीवन घडविण्यात सिंहाचा वाटा आहे याची जाणीव ठेवून आणि ज्या समाजात आपण घडलो. त्या समाजाचं ऋण फेडण्याची संधी मिळावी या जाणिवेतून त्यांनी शाळेसाठी 1992 -93 सालाचा इयत्ता 7 वीच्या माजी विद्यार्थ्यांनी अमूल्य देणगी दिली आहे. त्यांच्या या कर्तृत्वाला सलाम. माजी विद्यार्थी बंडू पाटील, उदय पाटील, भगवंत कलागते, सुरेश अर्धाळकर, देवदास पाटील, शरद अस्वले, महादेव मगदूम, सुभाष पाटील, सतीश पाटील, बाळू पाटील,अमोल दळवी, रमेश पाटील, शिवाजी भोसले, लता पाटील, जयश्री बराटे, सुलोचना गोंधळी, वैशाली पाटील, सुशीला बराटे, यांनी आपली वर्ग मैत्रीण कैलासवासी भारती सावंत यांची आठवण म्हणून भेट वस्तू दिली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक स्टाफ, ग्रामपंचायत विजय पाटील, सुरेश अस्वले, मयुरी कुन्नुरे, एस डी एम सि कमिटी. अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य व गावातील नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta